*कोंकण एक्सप्रेस*
*शेतकरी जगला तर आपण जगू – उद्योगमंत्री उदय सामंत*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
शेतकरी लाकूड व्यापारी संघटना,संगमेश्वर आयोजित भव्य सत्कार सोहळ्याला राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा.ना.उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी मा.ना.उदयजी सामंत ह्यांनी वृक्षतोड विधेयकासंदर्भात संवाद साधला.कोकणातील सर्वाधिक लागवड असणाऱ्या खैराच्या झाडाला १२ नंबर सूची मधून वगळण्यात आले आहे.ऐन,किंजल हे वृक्ष देखील या विधेकातून वगळण्यात आल आहे.तसेच शेतकऱ्यांच्या रोजगारवाढीसाठी खैराची झाडं मोफत देण्याचा निर्णय डीपीडीसीतून घेण्यात आला असल्याचं मा. ना.उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.
आपण काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.जनेतची कामं करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद यावेळी मिळाला असल्याचं मा.ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.याप्रसंगी आमदार शेखर निकम यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.