अभाविपचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबरला सावंतवाडीत

अभाविपचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबरला सावंतवाडीत

*कोंकण एक्सप्रेस*

*अभाविपचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन २७ ते २९ डिसेंबरला सावंतवाडीत*

*केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते उद्घाटन*

*तर समारोपाला मंत्री नितेश राणे व विनोद तावडेंची उपस्थिती*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण प्रांताचे अधिवेशन २७ ते २९ डिसेंबर ला यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथे होत आहे या अधिवेशनाचे उद्घाटन २७ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप २९ रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधी चौक येथे जाहीर सभेने होणार आहे.या अधिवेशनाला भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे मंत्री आशिष शेलार मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री महामंत्री संकल्प फळदेसाई व सचिव अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संकल्प फळदेसाई म्हणाले,अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला २६ रोजी आता सायंकाळी सहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल या प्रदर्शनामध्ये कोकणातील लोककला कोकणातील लोककला आणि आणि समावेश दाखवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाणे जनता सहकारी बँकेचे शरद गांगल व भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर २०० नी ध्वजा रोहनाने सकाळी अकरा वाजता प्रांत अधिवेशनाला सुर होणार आहे या अधिवेशनात अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे हे

ध्वजारोहणाने सकाळी अकरा वाजता प्रांत अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या अधिवेशनात अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे हे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी व मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या अधिवेशनाची टॅग लाईन विकसित कोकण समृद्ध कोकण असून स्थळाला अहिल्याबाई होळकर नगरी तर सभागृहाला पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. या अधिवेशनात परिसंवाद होणार आहेत त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण संविधान सागरी सुरक्षा शेती व फळ प्रक्रिया व्यापार पर्यटन नवीन तंत्रज्ञान बँकिंग व उद्योग व्यवसाय या संदर्भात मार्गदर्शन होणार आहे. तर २८ रोजी विविध विषयावर परिसंवाद व चर्चासत्र होणार आहे यामध्ये विविध प्रांतातून आलेले विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांना तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत तर २९ रोजी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या दिवशी सकाळी सावंतवाडी शहरात संध्याकाळी चार वाजता शोभायात्रा निघणार आहे यामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हे शोभायात्रा सावंतवाडी शहरातील विविध भागातून निघणार आहे. त्याची सांगता गांधी चौक येथे होणार आहे सांगता सभेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय पदाधिकारी शिवानी खरवाल या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी नवीन प्रांत कार्यकारणी घोषित करण्यात येणार आहे तसेच विविध प्रस्ताव ठेवून त्यावर चर्चा करून घेण्यात येणार आहेत. या अधिवेशनाला पालघर ते गोवा येथील १ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत या अधिवेशनाची भोसले नॉलेज सिटी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!