*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी भाजपाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती वैभववाडी भाजपा च्या वतीने साजरी करण्यात आली.येथील भाजपा कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यालयात अटलजींच्या कवितांचे वाचन करण्यात आले.
यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे,जिल्हा बँक माजी संचालक गुलाबराव चव्हाण, माजी सभापती अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत,युवा मोर्चा अध्यक्ष अतुल सरवटे,मनोहर फोंडके, समाधान गुरव,दीपक लाड,महेश रावराणे,एकनाथ पवार, श्रीकृष्ण पवार,प्रकाश पवार,सुहास दळवी,अनंत फोंडके व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.