*कोंकण एक्सप्रेस*
सातरल-कासरल शाळेतील पोषण आहाराच्या भांड्यांची चोरी*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील जि.प.शाळा सातरल कासरल येथील शालेय पोषण आहाराच्या खोलीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतील ४ हजार ५७५ रुपयांची भांडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
या प्रकरणी मुख्याध्यापक दत्तात्रय बळीराम सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरीची घटना २३ डिसेंबर रोजी स. १० वा. उघडकीस आली.शनिवारी सकाळी ११ वा. शाळा बंद करण्यात आली होती. सोमवारी सकाळी १० वा. मुख्याध्यापक व अन्य शिक्षक शाळेत आले असता त्यांना पोषण आहाराच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला.तसेच खोलीतील व कपाटातील काही पोषण आहाराची भांडी निदर्शनास आली नाही.
मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत यांनी याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिली.याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.