ग्राहकाने ग्राहकच रहावे,’गिर्‍हाईक’ बनू नये- अशोक करंबेळकर

ग्राहकाने ग्राहकच रहावे,’गिर्‍हाईक’ बनू नये- अशोक करंबेळकर

*कोंकण एक्सप्रेस*

*ग्राहकाने ग्राहकच रहावे,’गिर्‍हाईक’ बनू नये- अशोक करंबेळकर*

*कणकवली : प्रतिनिधी*

ग्राहकाने खरेदी करताना ग्राहक बनूनच खरेदी करावी स्तू किंवा सेवा देणाऱ्याचे गिर्‍हाईक बनू नये अशा मार्मिक शब्दात ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कणकवली शाखेचे सल्लागार अशोक करंबेळकर यांनी मार्गदर्शन केले.

कणकवली तहसीलदार कार्यालय आणि आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र कणकवली शाखा यांच्यावतीने तहसीलदार कार्यालय कणकवली येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला , त्यावेळी ते बोलत होत.

या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने आणि ग्राहकतीर्थ स्व. बिंदूमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांची प्रतिमा व ग्राहक पंचायत पुस्तिका कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांना भेट देण्यात आली.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवली तालुका अंतर्गत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे बक्षीस वितरण सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सौ.श्रद्धा कदम ,अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका कणकवली, माननीय अशोक करंबेळकर सल्लागार ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका कणकवली यांनी उपस्थिताना ग्राहक पंचायतच्या कार्यबाबत मार्गदर्शन करून ग्राहक संरक्षण कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात माननीय तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे यांनी ग्राहकाने वस्तू किंवा सेवा खरेदी करताना कोणती जागरूकता पाळावी, कसे सजग राहावे याबाबत उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन करून ग्राहकांच्या हक्काबाबत सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका शाखा कणकवलीच्या सचिव सौ.पूजा सावंत तसेच मंडळ अधिकारी श्री. संतोष नागावकर यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी माननीय दीक्षांत देशपांडे,तहसीलदार , कणकवली, मा.नायब तहसीलदार श्री. वरक, मा.नायब तहसीलदार श्री. कोकरे, माननीय पुरवठा अधिकारी,श्रीमती रति घोडके, गोडाऊन मॅनेजर नितीन डाके,व जगदीप चाळके,तसेच रेशन धान्य दुकानदार आणि तालुका ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा,सौ. श्रद्धा कदम, सल्लागार मा. अशोक करंबेळकर, सचिव सौ. पूजा सावंत, सहसचिव श्री.विनायक पाताडे, संघटक श्री. राजन भोसले, कोषाध्यक्ष श्री. सुभाष राणे, नामदेव जाधव, महानंदा चव्हाण, प्रकाश वाळके, चंद्रकांत चव्हाण आदी पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!