*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळ तहसिलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा*
*कुडाळ : प्रतिनिधी*
कुडाळ तहसिलदार कार्यालयात नुकताच ३८ वा राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुडाळ तालुका तहसिलदार श्री. वसावेसाहेब यांनी भुषविले. कार्यक्रमास जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सभासद श्री.दयानंद चौधरी, प्रा.सुभाष बांबुळकर, डॉ.मिलिंद बोर्डवेकर, श्री.आनंद मेस्त्री व श्री.विष्णूप्रसाद दळवी उपस्थित होते.तहसिलदार कार्यालयातील सौ.जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.तसेच मोठ्या प्रमाणात रेशन दुकानदार, गॅस वितरक,पेट्रोल पंपधारक अनेक ग्रामपंचायतींचे कर्मचारी हजर होते.
प्रथम मा. तहसिलदार व श्री. चौधरी यांचे हस्ते ग्राहक चळवळीचे प्रणेते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व सर्व महनिय पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर तहसिलदार व सर्व वक्त्यांनी ग्राहक चळवळ व ग्राहक संरक्षण कायदा तसेच ग्राहकांचे हक्क व कर्तव्यांबाबत सभेस संबोधन केले.
अनेक वक्त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक ग्राहकतिर्थ कै. बिंदुमाधव जोशी यांच्या कार्याचा परिचय सभेस करुन दिला. त्यानंतर तालुक्यातील ग्राहक सेवे बाबत उल्लेखनिय कामगिरी केलेल्या व्यक्तिंचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व एका सुंदर कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने सांगता झाली.