*कोकण Express*
*सावंतवाडी शिक्षक समिती प्रीमियर लीगचे शानदार उद्घाटन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडी यांच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक समिती क्रिकेट प्रिमियर लीगचा शानदार उद्घाटन सोहळा जिमखाना मैदान सावंतवाडी दिमाखदारपणे पार पडला.
शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा व खिलाडूवृत्ती जोपासली जावी यासाठी समितीच्या वतीने आयोजित केल्या असून यावेळी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष नितिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्यात नगराध्यक्ष श्री संजू परब ,सभापती मानसी धुरी, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक समिती राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सचिन मदने, सल्लागार भाई चव्हाण शिक्षक पतपेढी अध्यक्ष दादा जांभवडेकर जिल्हा कार्यकारी सदस्य तालुका कार्यकारी सदस्य उपस्थित होते. .
उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष सतिश राऊळ व सचिव अमोल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंतवाडी शिक्षक नेते नारायण नाईक यांनी केले.