*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला येथे २६ पासून कॅरम,टेबल टेनिस,बॅडमिंटन,ब्रिज खेळांचे हिवाळी प्रशिक्षण शिबीर*
*कासार्डे प्रतिनीधी ; संजय भोसले*
सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईल पुरस्कृत हिवाळी प्रशिक्षण शिबीर वेंगुर्ला येथे दि. २६ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्याने संपन्न होत आहे. यामधे कॅरम, टेबलटेनिस, बॅडमिंटन व ब्रीज या खेळाच्या खेळाडूंना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे.
या शिबीरासाठी इंडियन ऑईलचे आंतराष्ट्रीय खेळाडू तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार आहेत.कॅरम प्रशिक्षक श्री योगेश परदेशी ३ वेळा विश्वविजेतेपदासह ७० आंतरराष्ट्रीय पदके मिळवणारे जगातील एकमेव खेळाडू आहेत. बॅडमिंटन प्रशिक्षक श्री दिपांकर भट्टाचारजी दोन वेळा ऑलिंपिक मधे भारतातर्फे सहभागी झालेले आहेत.
टेबलटेनिस प्रशिक्षक श्रीमती इंदू आणि श्रीमती कांचन बसाक ह्या दोघीही राष्ट्रीय विजेत्या आहेत, तर ब्रीज प्रशिक्षक श्री उदय बेडेकर हे भारतातर्फे सार्क स्पर्धेमधे सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना ही सुवर्णसंधी इंडियन ऑईलच्या सौजन्याने उपलब्ध झाली आहे.
या संधीचा फायदा जास्तीत जास्त किशोरवयीन मुला मुलींनी करून घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री पारितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुधीर भणगे यांनी केले आहे.कॅम्प संदर्भात अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर ७६२०७५५७६६ यांच्याशी संपर्क करावा.