*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय वीरबाला वीरता दिन उत्साहात साजरा*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय वीरबाला वीरता दिन साजरा करण्यात आला.या दिनांचे महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी राष्ट्रीय वीरबाला वीरता दिनांचे उदाहरणांसह मार्गदर्शन करून राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थ्यांचे योगदान किती महत्वाचे असते या विषयी मार्गदर्शन करून प्रशालेतील इयत्ता ५ वी अ मध्ये शिकत असलेला विद्यार्थी कुमार मयंक मनोहर बाचोळकर याने समाजातील गरजू आणि संकटग्रस्त व्यक्तींना मदतीचा हात देऊन उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल प्रशालेमार्फत वीरता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅड सौ शिरसाट मॅडम सौ केळूसकर मॅडम श्री नेताजी जाधव सर उपस्थित होते.

