*कोंकण एक्सप्रेस*
*गोवंश हत्येच्या निषेधार्थ खेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*खेड : प्रतिनिधी*
खेड शहरालगत असणाऱ्या नारंगी नदीपात्रात देवणे पुलाजवळ रविवारी दुपारी गो वंशाचे अवयव आढळून आले होते तर सोमवारी देखील असाच प्रकार निदर्शनास आला त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असतानाच खेडवासीयानी मंगळवारी खेड बंदची हाक दिली होती.त्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी खेळ शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे देखील दिसून येत होते.सकल हिंदू समाजाचे वतीने हिंदू बांधवांनी एकत्रित येत खेड पोलीस स्थानकात या घटनेचे निषेध नोंदवणारे निवेदन देखील प्रशासनाला दिले असून प्रशासनाने कालपर्यंत चार जणांना मंगळवारी पाचव्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.
या बंदमध्ये सर्वपक्षीय व सर्व धर्मीय लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हा बंद यशस्वी केल्याचे चित्र खेड शहरात पाहावयास मिळत आहे. या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत हा बंद यशस्वी झाला आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून या बंद दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन खेडवासीयांना केले असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील खेड पोलिसांनी दिले आहे.