*कोंकण एक्सप्रेस*
*उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पालीत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आजपासून २४,२५,२६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. सामने होणार आहेत. त्याचप्रमाणे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा २६ डिसेंबर रात्रौ १०.०० वा. होणार आहे.
त्याचदिवशी मनोरंजनाचा कार्यक्रम मुंबई प्रस्तुत बहुरंगी नमन झुंजला मराठा सहयाद्रीचा हा कार्यक्रम होणार आहे.हे सर्व कार्यक्रम डि. जे.सामंत महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन पाली युवा मंच, शिवसेना, युवा सेना शाखा पाली पाथरट यांनी केले आहे.