*कोंकण एक्सप्रेस*
*चराठा सातेरीचा २७ डिसेंबरला जत्रोत्सव*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरासह चराठा ग्रामदैवत असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २७ डिसेंबर रोजी होत आहे. देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.रात्री उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.

