स्पर्धात्मक युगामध्ये प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवा : डॉ.रुपेश पाटकर

स्पर्धात्मक युगामध्ये प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवा : डॉ.रुपेश पाटकर

*कोंकण एक्सप्रेस*

*स्पर्धात्मक युगामध्ये प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवा : डॉ.रुपेश पाटकर*

*मालवण : प्रतिनिधी*

आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे.या ताण तणावाच्या युगात ताण कमी करणे.संवाद साधणे, सहानुभूती ने वागणे तसेच सतत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी सकारात्मक मार्गांनी विचार करणे आवश्यक असून भावनिक बुद्धिमत्ता जोपासना केली तर आपले चांगले व्यक्तिमत्व आपण उत्तम प्रकारे बनवू शकतो असे उद्गार प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.रुपेश पाटकर यांनी जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठान या सामाजिक शैक्षणिक कार्य करणाऱ्या समिती मार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सं कट्टा या ठिकाणी “भावनिक बुद्दिमता व व्यवस्थापन” या व्याख्यानाच्या निमित्ताने काढले.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.श्रीकांत धारपवार यांनी समिती चे सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती देताना आज शिक्षण व शाळेत शिक्षण घेणारी मुले व आज त्याच्या गरजा व त्यांना करण्यात येणारे समुपदेशन याबद्दल तसेच जयश्री जयराम धारपरिवार प्रतिष्ठान चे उद्दिष्टे सांगताना सामजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या कार्याचा आलेख मांडला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेऊन भावनिक बुद्धिमत्ता जोपासण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचेकडून डॉ.रुपेश पाटकर यांच्या सामाजिक कार्यासाठी कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल धारपवार प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष मा.श्री सुधीर वराडकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे मॅडम, धारपवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत धारपवार व व्याख्याते डॉ. रुपेश पाटकर,श्री. गोरक्ष परब आदी मान्यवर उपस्थित होते.प्रशालेतील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!