*कोंकण एक्सप्रेस*
*मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा श्री नितेशजी राणे यांनी स्वीकारला पदभार*
*कणकवली : प्रतिनिधी*
तत्पूर्वी त्यांनी प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
मंत्रालयात तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर मंत्रालयातील दालन क्रमांक 2, मंत्रालय मुख्य इमारत या दालनात जाऊन पदभार स्वीकारला. यावेळी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला.

