*कोंकण एक्सप्रेस*
*विश्वमंगल गोशाळेच्या विस्तारासाठी अनुजा पेठकर आणि श्री.इनामदार यांनी घेतली खास.नारायण राणेंची भेट*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
विश्वमंगल गोशाळा आणि सोमेश्वर शांतीपीठच्या संस्थापिका सौ. अनुजा विनोद पेठकर आणि मार्गदर्शक व ट्रस्टी श्री.इनामदार सर यांनी आज मंत्री मा.नारायणजी राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, गोशाळेची स्थिती आणि तिच्या कार्याबद्दल मा.राणे यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
सौ.अनुजा पेठकर आणि श्री.इनामदार सर यांनी गोशाळेच्या कामकाजाचे तसेच त्याच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या मदतीचे आवाहन केले.गोशाळेची सेवाभावी कार्यपद्धती आणि समाजाच्या कल्याणासाठी केली जाणारी मेहनत याबद्दल चर्चा करण्यात आली.
या भेटीमध्ये मा.नारायणजी राणे यांनी गोशाळेच्या उपक्रमास आपली सहानुभूती व्यक्त केली आणि भविष्यात गोशाळेला मदत करण्याचे व एकदा गोशाळेला प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी गोशाळेच्या कार्याला पुढे आणण्यासाठी प्रत्येक संभव मदतीसाठी तयार राहण्याचे सांगितले.
या भेटीला महत्त्वपूर्ण ठरलेल्या दोन्ही संस्थांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले असून, गोशाळेच्या कार्याला अधिक बल मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.