‘फास्टेस्ट स्विमर’ स्मरण मंगलोरकर, अनुश्री जाधव

‘फास्टेस्ट स्विमर’ स्मरण मंगलोरकर, अनुश्री जाधव

*कोंकण एक्सप्रेस*

*’फास्टेस्ट स्विमर’ स्मरण मंगलोरकर,अनुश्री जाधव*

*चिवला बीच येथील राज्यस्तरीय सागरी जलतण स्पर्धेची सांगता :हजारो स्पर्धकांचा सहभाग*

*मेक्सीको येथील महिला स्पर्धकही सहभागी*

*मालवण : प्रतिनिधी*

हजारो स्पर्धेकांच्या उत्स्फूर्त सहभागातून मालवण चिवला बीच येथे आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.राज्यस्तरीय स्पर्धक व अन्य राज्यातील निमंत्रित स्पर्धक यांच्या सहभागातील यां स्पर्धेत ‘फास्टेस्ट स्विमर’ हा बहुमान बेळगाव येथील स्मरण मंगलोरकर व बेंगलोर येथील अनुश्री जाधव यांनी पटकावत मानाची ट्रॉफी प्राप्त केली.

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी १ किमी,२ किमी,३ किमी आणि ५ किमी अंतराच्या मुलांच्या व मुलींच्या गटातील स्पर्धा झाल्या.यामध्ये १ किमी मुलांमध्ये – स्वरम केळूसकर (ठाणे), मुलींमध्ये गरिमा पाटील (ठाणे), २ किमी मुलांमध्ये वेदांत मिसळे (बेळगाव),मुलींमध्ये रेवा परब (ठाणे), ३ किमी मुलांमध्ये आदी शिरसाट (बेंगलोर),मुलींमध्ये डिंपल गोवडा (बेळगाव),तर ५ किमी मुलांमध्ये स्मरण मंगलोरकर (बेळगाव), मुलींमध्ये अनुश्री जाधव (बेंगलोर) हे वेगवान जलतरणपटू ठरले. त्यांना चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अन्य गटातील विजेत्यांना गौरवण्यात आले.लाखोंची रोख पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित 14 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रमाणे दुसऱ्या दिवशी राज्यभरातील स्पर्धक मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.रविवार 22 रोजी सकाळी 5 किमी, 3 किमी. 2 किमी व 1 किमी स्पर्धा संपन्न झाली.त्यानंतर बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.

यावेळी राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर, मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, संस्था उपाध्यक्ष निल लब्दे, किशोर पालकर, खजिनदार अरुण जगताप, लाईफगार्ड टीम लीडर युसूफ चुडेचरा, शिवछत्रपती राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागरकन्या रुपाली रेपाळे,सदस्य भास्कर कुलकर्णी, मनीषा शेडगे,श्री.घनश्याम,आरती भारद्वाज,भरत सैनी,मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर,माजी नगरसेवक दीपक पाटकर, शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर,डॉ.राहुल पंतवालावलकर,लक्ष्मीकांत खोबरेकर,सहायक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, डॉ.सचिन शिंदे,किल्ला रिसॉर्ट मालक उद्योजक बंडू कांबळी मालवण नगरपालिकेचे कर्मचारी महेश परब,संध्या गवळी,श्रद्धा आरेकर,दिनेश राऊत अन्य मान्यवर स्पर्धक,प्रशिक्षक व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

चिवला बीच येथील स्पर्धेदरम्यान स्पर्धा प्रमुख राजेंद्र पालव मार्गदर्शनाखाली युसूफ चुडेसरा,निल लब्दे,समुद्रात लाईफ गार्ड, लाईफ बोट यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धकावर लक्ष ठेवला जातो. किनाऱ्यावर ऍम्ब्युलन्स,डॉक्टर तैनात असतात.तसेच आयोजक टीमचेही किनाऱ्यावरून स्पर्धकांवर लक्ष असते.या सर्वातून स्पर्धा यशस्वी ठरली.

स्पर्धेतील निमंत्रित गटात मॅक्सीको येथील रेगीना स्यांचीस महिला स्पर्धक सहभागी झाली.तीन किलोमीटर गटात सहभागी होत त्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.त्या बेंगलोर येथे कार्यरत असतात.त्यांचे यश स्पर्धेची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचल्याची पोचपावती ठरली असे सहभागी मान्यवरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!