*कोंकण एक्सप्रेस*
*आकेरी भुईकोट येथे मार्गदर्शक फलकाचे अनावरण*
*दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर मार्गदर्शक फलक लावण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे.आकेरी किल्ला भुईकोट याचेच एक उदाहरण म्हणजे कुडाळ तालुक्यात असलेला आकेरी किल्ला भुईकोट आज केवळ अवशेष रुपात शिल्लक असलेल्या या भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गांवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत मार्गदर्शक फलक आज लावण्यात आले.
आकेरी किल्ला भुईकोट सावंतवाडी शहरापासुन ७ कि.मी.अंतरावर तर कुडाळपासून १५ कि.मी.अंतरावर आहे.आकेरी भुईकोटबद्दल दुर्गप्रेमीना सहसा माहिती नाही.यापूर्वी दुर्ग मावळा प्रतिष्ठान मार्फत आकेरी भुईकोटाची स्वच्छता करण्यात आलेली होती.या भुईकोटाची माहिती सर्वांना व्हावी हा उद्देश समोर ठेवून भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गांवर मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. या फलकांवर क्यूआर कोड ठेवण्यात आलेला आहे.हा कोड स्कॅन केल्यावर दुर्गप्रेमीना आकेरी भुईकोटाबाबत अधिक माहिती,नकाशा व फोटो बघता येणार आहेत.या मार्गदर्शक फलकांसाठी चंद्रशेखर जोशी व हेमांगी जोशी यांनी आर्थिक सहकार्य केले.मनोज परब यांनी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
या मोहिमेसाठी समिल नाईक,पंकज गावडे,शिवाजी परब,हेमांगी जोशी, रोहन राऊळ,साईप्रसाद मसगे,सुहास सावंत,केशव ठाकूर, सुषमा पालव,प्रसाद पालकर,संदिप सुद,गार्गी नाईक,गणेश नाईक इत्यादी उपस्थित होते.सर्वांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार मानण्यात आले.