कोकणात जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतील अशा संधी मला निर्माण करायच्या आहेत – नाम.नितेश राणे

कोकणात जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतील अशा संधी मला निर्माण करायच्या आहेत – नाम.नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणात जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतील अशा संधी मला निर्माण करायच्या आहेत -नाम.नितेश राणे*

*मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास*

*कोकण किनारपट्टीचा विकास,आणि सुरक्षेला प्राधान्य देऊन दरडोई उत्पन्न वाढविणार*

*कणकवली : प्रतिनिधी*

कोकणातील आंबा, काजू, सुपारी,मासे यावर येथील मोठे अर्थकारण अवलंबून आहे.कोकणातील तरुण वसई, विरार, नालासोपारा आदी भागात रोजगारासाठी जात होता. हा स्थलांतरीत होणारा तरुण येथेच रोजगारासाठी थांबला पाहिजे.असे काम इथे करायचे आहे. अन्य शहरांच्या तुलनेत इथे कोकणात जास्त पगार मिळेल अशी स्थिती मला कोकणात निर्माण करायची आहे.असा विश्वास राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे कणकवली खारेपाटण येथे बोलताना केले.

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री झाल्यानंतर त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहिलाच दौरा होता.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे ऐतिहासिक असे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते.

सर्वांना एकत्र घेऊन सिंधुदुर्ग, कोकणाचा विकास करायचा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही मत्स्य तसेच बंदर ही दोन्ही खाते यापूर्वी सांभाळली आहेत,राणे साहेबांचा प्रवास मत्स्य खात्यातून सुरू झाला होता.त्यांनी बंदर खातं पण सांगाळलं होतं. आमच्यासोबत असलेले रवी चव्हाण यांनीही चांगला अनुभव आहे. दीपक केसरकर आहेत,पूर्वी खासदार असलेले व आता आमदार झालेले नीलेश राणे आहेत.माजी आमदार अजित गोगटे माझ्यासोबत आहेत.या सर्वांचा बलाढ्य अनुभव माझ्याकडे आहे.या अनुभवावर मोठे काम करून दाखवायचे आहे.हे खातं सांगाळताना किनारपट्टीचे संरक्षण तसेच विकास याचाही विचार करायचा आहे. दरडोई उत्पन्न वाढवायचे आहे,असे प्रतिपादनं नाम.नीतेश राणे यांनी येथे केले.

पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे हा माझा प्रश्न नाही,वरिष्ठ देणार ती जबाबदारी मला पार पाडायची आहे.असेही पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.सर्व बाबी विचारात घेऊन किनारपट्टीवर असलेल्यांना एकत्र घेऊन विकास करायचा आहे, कोकणातील आंबा, काजू, सुपारी, मासे यावर मोठे अर्थकारण अवलंबून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बारकाईने विचार करून मला या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. या दोन्ही खात्यांमुळे दरडोई उत्पन्न बाढविण्याची संधी मला आहे.माझ्या खात्याचा वापर करून कोकण, महाराष्ट्रासाठी त्याचा फायदा करून देणार, असेही नाम, नीतेश राणे यांनी सांगितले.

श्री. राणे पुढे म्हणाले,कुठल्याही पद्धतीचा सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून कोकण किनारपट्टीवर हल्ला येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. २६/११ चा हल्ला समुद्राच्या माध्यमातून झाला होता.असे काही राष्ट्रविरोधी विचाराचे लोक राहतात,त्यांच्यावर बारकाईने लक्ष राहील सागरी सुरक्षा हा महत्वाचा भाग आहे. नुसतं विकास बोलत राहिली आणि उद्या कुठेही किनारपट्टीवर हल्ला झाला तर चुकीचे होईल. किनारपट्टीवरील सीआरझेड,अतिक्रमणे आहेत,ती धोक्याची ठरू शकतात.किनारपट्टीवर काही अतिरेकी मानसिकतेचे लोक वावर करत आहेत.गेल्याच महिन्यात रत्नागिरीत अतिरेकी संघटनेशी निगडीत काहीजण अटक झाले ते किनारपट्टीवर राहत होते.अशांबर बारीक नजर राहणार आहे.किनारपट्टी मुक्त करायची आहे, असे श्री. राणे यांनी सांगितले.

देवगडचा आमदार कधी मंत्री होत नाही.ती नेहमी विरोधी पक्षात बसणार, असा आरोप, टीका केली जात असे. मात्र आता माझ्या रुपाने उदाहरण मिळाले आहे. यापुढे कधीही असा ठपका ठेवला जाणार नाही आता पत्रकारांनी असा प्रश्न कधीही उपस्थित करू नये असेही श्री. राणे म्हणाले,विरोधक अजूनही काही उरलेले असतील तर ‘राणे संपले’ अशी टीका करणाऱ्या विरोधकांना आता त्याचे उत्तर मिळाले असेल,विरोधकांनी दहा वर्षे मला खूप अनुभव दिले आहेत. मला किती प्रेम दिले,हे त्यांनाही माहिती आहे.ते सत्तेत असताना विरोधक म्हणून माझ्याशी कसे वागले,त्याची त्यांना आठवण करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असेही श्री.राणे म्हणाले.

आज माझ्या होणाऱ्या स्वागताचा क्षण कार्यकर्त्यांमुळे अनुमवायला मिळाला. कार्यकर्ते सोबत राहिले.त्यामुळे त्यांचा हट्ट पुरवणं हे माझे कर्तव्य आहे.त्यांच्या मनाप्रमाणे स्वागत स्वीकारत आहे. तेच ताकद देतात,स्वतःच्या घराची,कुटुंबाची तोकांची पर्वा न करता ते माइयासाठी येतात कार्यकर्ते नसते तर हा क्षण नसते त्यामुळे आज माझे स्वागत त्यांच्या मनाप्रमाणे करायला देणार प्रत्येकाला वाटलं पाहिजे की तो कार्यकर्ताच मंत्री झाला पाहिजे, असेही श्री राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!