*कोंकण एक्सप्रेस*
*बंदर व मत्स्य विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे राजापुरात जंगी स्वागत*
राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचा शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोकणात राजापूर रानतळे येथील हेलिपॅडवर दाखल झालेल्या राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे राजापुरात महायुतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. ना. राणे यांच्या स्वागतासाठी भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटना पदाधिका-यांनीही हजेरी लावली होती.
मुंबईरून हॅलिकॉप्टरने राजापूरात रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल झालेल्या ना. राणे यांचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना. नितेश राणे हेलिपॅडवर उतरताच नितेशजी राणे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी सारा परिरसर दणाणून सोडला.
भाजपा युवा नेते व प्रवक्ते आणि कणकवली, देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघातुन नितेश राणे तिसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहे. त्यांनी १५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्वृत्वाखालील सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर ते नागपूर हिवाळी अधिवेशनात व्यस्त होते. शनिवारी रात्री मंत्रीमंडळाचा विस्तार झाला व नितेश राणे यांना बंदर व मत्स्य विकास मंत्रालयाचा पद्धार देण्यात आला.
त्यानंतर रविवारी प्रथमच ना. राणे हे कोकण दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी १० वाजता रानतळे येथील हॅलिपॅडवर दाखल झाले. यावेळी त्यांचे राजापूर, लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपाली पंडीत व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांसह भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बैंक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपा राजापूर तालुका अध्यक्ष सुरेश गुरव, भास्कर सुतार, महिला आघाडीच्या सुयोगा जठार, शृती ताम्हनकर, शितल पटेल, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, स्वप्निल गोठणकर, विवेक गुरव, शीळ सरपंच अशोक पेडणेकर व शीतल रहाटे, अद्वैत अभ्यंकर, भाजपा प्रदेश ओबीसी सेलचे अनिल करंगीटकर, दीपक बेंद्रे, सिंधुदुर्ग जि. प. चे माजी अध्यक्ष गोटया सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, शहर प्रमुख सौरभ खडपे, भरत लाड, सिंधुदुर्ग राष्ट्रवादीचे आबीद नाईक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजित कांबळे, भाजपा शहर अध्यक्ष संदेश आंबेकर, राजा खानविलकर, अमोल सिनकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अरवींद लांजेकर, ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, विनायक कदम, अमर वारीसे, लांजाचे नगरसेवक संजय यादव, भाजपाचे विनायक दिक्षित, बाळ दाते, वसंत पाटील, शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, अजित नारकर, नाना कोरगावकर, राजापूर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, व्यापारी दिनानाथ कोळवणकर, विवेक गादीकर, राजन नवाळे, नाणार रिफायनरी समर्थक समितीचे अविनाश महाजन, निलेश पाटणकर, यांसह महायुतीचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासकिय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.