*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेत धनश्री कानकेकर,ओंकार मेस्त्री प्रथम*
*कासार्डे प्रतीनिधी ; संजय भोसले*
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय पोस्टर स्पर्धेत माध्यमिक गटात धनश्री कानकेकर, (शेठ म.वि केसरकर माध्य विद्यालय वारगाव), कनिष्ठ महाविद्यालय गटात ओंकार मेस्त्री (कासार्डे ज्यु.कॉलेज) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
दोन गटांत आयोजित या पोस्टर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी) विषय- ‘वस्तूची खरेदी विक्री’ असे होते. या स्पर्धेत द्वितीय कल्पेश निकम (कासार्डे माध्य विद्यालय कासार्डे), तृतीय तुषार मेस्त्री(विद्यामंदिर हायस्कूल कणकवली)कनिष्ठ महाविद्यालय गट(इयत्ता ११ वी ते इयत्ता १२ वी)विषय-जागो ग्राहक जागोद्वितीय सृष्टी खानोलकर(कासार्डे ज्यु.कॉलेज), तृतीय अमिषा लिंगायत (कासार्डे ज्यु.कॉलेज) यांनी यश मिळविले आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या वतीने २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ५०१, ३०१, २०१ तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या तालुकाध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गीतांजली कामत,सचिव पूजा सावंत,सहसचिव विनायक पाताडे यांनी केले आहे.