*कोंकण एक्सप्रेस*
*कुंब्रल लांबरवाडी महावितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मर व फ्युज पेटीची दुरावस्था*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
कुंब्रल लांबरवाडी येथे बसविण्यात आलेल्या महावितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मर व फ्युज पेटीची दुरावस्था झाली असून,याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे.असा दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार महावितरण विभाग करत आहे.हा ट्रान्सफॉर्मर व फ्युज पेटी तात्काळ नवीन बसवा अन्यथा उपोषण करणार असा इशारा कुंब्रल लांबरवाडी येथील ग्रामस्थ तातू कोंडू लांबर यांनी दिला आहे. त्यांनी या संदर्भात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दोडामार्ग यांच्याकडे लेखी पत्र देखील दिले आहे.
लांबरवाडी येथे बसवण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर खराब झाला असून त्यातून ऑइल गळती होते,या ट्रान्सफॉर्मर च्या हमिंगचा आवाज मोठ्याने येतो.तसेच या ट्रान्सफॉर्मच्या विद्युत तारा दोन्ही बाजूंनी वेलींने वेढलेल्या आहेत.तसेच या ट्रान्सफॉर्मच्या खाली असलेल्या फ्युज पेटीची अक्षरशः दुर्दशा झाली असून ती फ्युज पेटी पूर्णपणे सडलेली आहे. तसेच त्यामध्ये बसवण्यात आलेले पार्ट पूर्ण खराब झालेले आहेत,त्यामुळे वारंवार बत्ती गुल होण्याचे प्रकार वाढत आहेत.तसेच या फ्युज पेटिची दोन्ही दरवाजे उघडे आहेत.तसेच विद्युत तारांवरील प्लॅस्टिक कोटींग सडले आहे,तसेच या ट्रांन्सफार्मरच्या संपूर्ण परिसराला वेलींनी वेढले आहे.
या परिसरात पायवाट असून या ट्रान्सफॉर्मच्या आसपास गुरेढोरे चरण्यासाठी तसेच नागरिकांची वर्दळ येथून होतं असते.ट्रांन्सफार्मच्या अशा दुर्दशेमुळे गुराढोरांना किंवा माणसांना शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही,येथे जिवितहानी होण्याची शक्यता आहे.अशी जिवीतहानी झाल्यास याला सर्वस्वी महावितरण विभाग जबाबदार राहील असे तातु लांबर यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
येत्या १५ दिवसांत ट्रान्सफार्म व फ्युज पेटी नविन बसविली नाही तर या सडलेल्या ट्रान्सफार्म च्या खाली उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तातू लांबर यांनी महावितरणाला दिला आहे.

