*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग-मोरगाव येथे विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव-बागवाडी येथील अर्जुन अभिमन्यू मोरजकर यांच्या शेत विहिरीत बिबट्या पडून त्याचा मृत्यू झाला.ही माहिती वन विभाग याना समजताच सावंतवाडी वन विभाग उपवनसंरक्षक नव किशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे,नेहा वातरे,पशुसहाय्यक,दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल,किशोर जंगले,वनपाल कोनाळ, संग्राम जितकर सुबोध नाईक,विश्राम कुबल,प्रकाश गवस,बाळकृष्ण सावंत,संतोष शेटकर इतर वन कर्मचारी यांनी मोरगाव बागवाडी येथे जाऊन विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृतदेह बाहेर काढला.

