*कोंकण एक्सप्रेस*
*बांदा पोलीस ठाणे व खेमराज इंग्लिश स्कूल बांदा कनिष्ठ महाविद्यालय शाळेतील विद्यार्थी सायबर जनजागृती अभियान*
“सावंतवाडी : प्रतिनिधी*
सायबर जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बांदा शाळेतील विद्यार्थीनी एकत्रित येत रॅली बांदा बाजारपेठतून काढण्यात आली.
सकाळी दहा वाजता बांदा बाजारपेठ येथे रॅली काढूत सायबर जनजागृती,नशा मुक्ती व डायल ११२ या विषयावर जनजागृती करण्यात आली.
सदर रॅलीत पोलीस निरीक्षक विकास बडवे,पोलीस अंमलदार,शिक्षक,विद्यार्थी मिळून एकूण ८० जणांनी सहभाग घेतला. रॅलीस मा.उप विभागीय पोलीस अधिकारी,सावंतवाडी विभाग यांनी मार्गदर्शन केले.

