*कोंकण एक्सप्रेस*
*निसर्गाच्या शरीररुपी अमुल्य ठेव्याचे उत्तम जतन करून ते शरीर अखेर पर्यंत रोगमुक्त ठेवणे ही प्रथम आपली जबाबदारी समजावी-डाॅ.शमिता बिरमोळे*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
स्त्रीयांनी आपल्या जीवनात पन्नास वर्षापर्यंत फीट असले पाहीजे.तर साठ वर्षाचे झालात तरी धीरीष्ठ राहून ऐंशीव्या वर्षी हिंडून फिरुन असले पाहीजे.यासाठी आपले आरोग्य चांगले राखायचे असल्यास या ध्येयाची सुरवात किशोरवयीन वयोगटापासून सुरवात केल्यास आपण भविष्यात येणारे अनेक आजार टाळू शकतो.यासाठी किशोरवयीन मुलींनी आत्तपासूनच आरोग्याला महत्त्व दिले पाहिजे.असे प्रसिध्द स्त्री रोग तज्ज्ञ तथा आरोग्य साक्षारता अभियानाच्या प्रमुख डॉ.शमिता बिरमोळे यांनी सांगितले.त्या कासार्डे माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी संघाने आयोजित केलेल्या किशोरवयीन मुलींच्या समस्या व आरोग्य व्याख्यानात मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी माजी विद्यार्थी संघ व कासार्डे हायस्कूलच्या वतीने डॉ.शमिता बिरमोळे यांचें शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री बिसुरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिक्षिका सौ.कासार्डेकर मॅडम,सौ.सरवणकर मॅडम,गुरुकृपा हाॅस्पिटल स्टाफ सानिका दळवी,साक्षी म्हसकर,स्वप्नाली गजबार, ऋतीका चव्हाण, माजी विद्यार्थी पत्रकार गुरुप्रसाद सावंत,सचिन राणे यांच्यासह महिला शिक्षक व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.बिरमोळे म्हणाल्या,आपले शरीर अमूल्य आहे.निसर्गाने आपल्याला ते फ्री दिल्याने आपल्याला त्याची किंमत कळत नाही.या शरीराची काळजी घेण्यासाठी आपली तपासणी बरोबर जीवन पध्दतीत त्या प्रमाणे बदल केले पाहिजेत.तरी याची सुरुवात आपण किशोर वयापासूनच केली पाहिजे.आपली संपत्ती ज्या प्रमाणे आपण संभाळतो त्याच प्रामाणे आरोग्याला महत्त्व दिले पाहीजे.मुलींना चांगले पोषण देऊन त्याचे हिमोग्लोबीन तपासणे सध्याची गरज आहे.अभ्यासाबरोबरच खेळणे महत्वाचे आहे.मुलींमध्ये हिमोग्लोबीन बारा असणे आवश्यक आहे.यासाठी आपल्या आहारात पालेभाजांचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्या.असे सांगत काही मुलींची तपासणी करून आरोग्य विषयक गोळया व औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.