फोंडाघाट येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर संपन्न

फोंडाघाट येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर संपन्न

*कोकण Express*

*फोंडाघाट येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मार्फत रक्तदान शिबिर संपन्न*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

कोरोना संक्रमण काळात विविध दवाखाने, हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रक्ताची उणीव भासत असताना फोंडाघाटच्या शिवसाम्राज्य प्रतिष्ठान ने रक्तदान शिबिर आयोजित केले. यावेळी फोंडाघाट प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जंगम, सावंतवाडी रक्तसंकलन केंद्राचे डॉक्टर बागवान, संजय पटेल, संजय अाग्रे राजन चिके उपस्थित होते.

यावेळी सुमारे ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये दुर्मिळ रक्तगटाचे रक्त दाते सुध्दा आढळले. यावेळी प्रतिष्ठान तर्फे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तसंकलन पेढीचे डाॅक्टर व स्टाफ- उज्वला वाडकर,मानसी बागेवाडी, अनिल खाडे, अस्लम शेख यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सचिन नाकाडी,राजु परुळेकर, विशाल रेवडेकर, साहील डोर्ले, जयेश पटेल, दिपक इस्वलकर,सागर साटम,प्रथमेश कल्याणकर, प्रथमेश राठोड, राकेश रासम, गणेश इस्वलकर, संजय सावंत आणि प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते. शिबिराच्या शुभारंभाचे प्रास्तविक आणि स्वागत साहील डोर्ले यांनी तर आभार प्रदर्शन विशाल रेवडेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!