*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या – उज्वला येळावीकर*
*महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे मागणी*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नाकडे महिला आयोगाकडून गार्भीयाने लक्ष देण्यात यावा,त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात,अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्वला येळावीकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे केली.सौ.चाकणकर या नुकत्याच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्या होत्या.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सौ.येळावीकर यांनी त्यांची भेट घेतली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी चाकणकर यांना दिले आहे.
यावेळी जिल्ह्यातील समाज महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी चाकणकर यांनी दिले.यावेळी येळावीकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या जीवनमानाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत,ज्या सोडवण्यासाठी महिला आयोगाकडून तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक आहे.यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. प्रसूतीसाठी आणि इतर आरोग्य समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना दूरच्या शहरी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. तसेच शिक्षण व रोजगाराबाबत मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच कौशल्य विकासाच्या संधी मर्यादित आहेत.
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील काही भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशा घटनांवर नियंत्रणासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे.महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी लांब प्रवास करावा लागतो,पण सार्वजनिक वाहतुकीची सोय अपुरी असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्याचबरोबर महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी असलेले शासकीय कार्यक्रम व योजना प्रभावीपणे राबविण्यात काही प्रमाणात अडथळे येत आहेत.तरी वरील समस्या सोडवण्यासाठी आपण तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाच्या
उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्वला येळवीकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनंतराज पाटकर, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय येळावीकर आणि कार्तिक कदम उपस्थित होते. यावेळी श्रीमती येळावीकर यांनी रुपाली चाकणकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.