*कोकण Express*
◾ *सकाळचे बातमी अपडेट / २१ February रविवार*
▪️ राज्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
▪️ त्यांनी सांगितले सरकार राज्यात संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत , नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार करत आहे
▪️ रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये जगातील सर्वांत मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे – तर जामनगर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प साकार होईल
▪️ कोरोना रुग्णाच्या वाढीमुळे दहावी बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढली आहे , त्यामुळे परीक्षा झाल्या तर त्या ऑनलाइन घ्याव्यात अशी मागणी ते करत आहेत
▪️राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविद्यालयं सुरू करण्याच्या निर्णयाचं काय होणार? हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता
▪️ यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले , महाविद्यालय सुरु करण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत
▪️ रेल्वे विभागाने NTPC परीक्षेबाबत मोठा निर्णय घेताला आहे. यानुसार रेल्वे विभागाने नोटीस काढत , 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणाऱ्या एनटीपीसी परीक्षा रद्द केल्या आहेत
▪️ अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात काही प्रमाणात थंडी वाढली आहे – तर हवामान आता सर्वत्र कोरडे राहील
▪️ कोरोनाला रोखण्यासाठी भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम होत आहे , पण कोरोना लस घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाची लागण होत आहे –
▪️ अशातच उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना , देखील लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे – त्यामुळे आता कोरोना लस सुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे

