हळवल येथे रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

हळवल येथे रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

*कोंकण एक्सप्रेस*

*हळवल येथे रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै.प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात तब्बल 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ.दिलीप घाडी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा रुग्णालय रक्त संकलन विभागाचे डॉ संकेत शेटे,श्रीमती प्रांजली परब,नेहा परब,ऋतुजा हरमलकर,विजय निरूखेकर, नितीन गावकर,आरोग्य सेविका निधी राऊळ, आशा सेविका प्रियांका तावडे,मंडळाचे अध्यक्ष लवू परब, अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दिपेश परब, दामोदर परब, दिपक राऊळ, वामन परब, दशरथ परब, मंगेश गावडे, प्रशांत गावडे, सतीश गावडे, विकास गावडे, महेश परब, अनिकेत परब, रोहन राणे, शैलेश परब, अक्षय गावडे, यशवंत परब, विक्रांत परब, यश परब, अमोल केतकर, रोशन राणे, किरण परब, ऋषीं राऊळ, मनीष परब, ओंकार राणे, गणेश गावडे, अक्षय मोर्ये, प्रतीक परब, रोहित राणे, प्रथमेश राणे, आदीसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील 19 वर्षे सातत्याने रक्तदान शिबीर आयोजित केले जाते.त्यासोबत अनेक सामाजिक उपक्रम देखील या मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात. मंडळाच्या सर्व उपक्रमांचे कौतुक करत मान्यवरांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम आदर्शवत असल्याचे गौरवोदगार काढले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश परब यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे व रक्तदात्यांचे अध्यक्ष लवू परब यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!