मुळदे येथे ३ जानेवारीला जिल्हास्तरीय खुली पुष्परचना स्पर्धेचे आयोजन

मुळदे येथे ३ जानेवारीला जिल्हास्तरीय खुली पुष्परचना स्पर्धेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*मुळदे येथे ३ जानेवारीला जिल्हास्तरीय खुली पुष्परचना स्पर्धेचे आयोजन*

* कुडाळ : प्रतिनिधी*

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे च्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय खुली पुष्परचना स्पर्धा दिनांक ०३ जानेवारी, २०२५ रोजी उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित केली आहे. तरी इच्छुकांनी सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मा. सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांचे वतीने करण्यात येत आहे.

स्पर्धेची नियमावली पुढीलप्रमाणे – १. प्रवेश फी रु. १००/- प्रति स्पर्धक,२.पुष्परचनेसाठी स्पर्धकास २x२ फूट ची जागा उपलब्ध करून दिली जाईल,३.पुष्परचनेसाठी आवश्यक सर्व साहित्य स्पर्धकाने स्वखचनि आणावयाचे आहे,४.आपली पुष्परचना दिनाक ०३ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परिक्षणासाठी तयार ठेवायची आहे,५.पुष्परचनेसाठी आपणास सकाळी ९.०० ते १०.०० हा एक तासाचा कालावधी देण्यात येईल.आपणास दिलेल्या अनुक्रमांकावरच आपली पुष्परचना मांडणे बंधनकारक आहे,६.पुष्परचनेचे परीक्षण तज्ञ परिक्षकांकडून करण्यात येणार आहे,७.आकर्षक सजावट, कल्पकता, वापरण्यात आलेले साहित्य, फुलांचा योग्य वापर इ.निकषांचा आधारावर चार क्रमांक काढण्यात येतील.

स्पर्धेची पारितोषिके -प्रथम क्रमांक-रु. ७,७७७/-प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांक-रु. ५,५५५/-प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह,
उत्तेजनार्थ क्रमांक १-रु. २,५५५/-प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ क्रमांक २-रु. २,५५५/- प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह
संपर्कासाठी  भ्रमणध्वनी क्रमांक – डॉ संदिप गुरव, सहयोगी प्राध्यापक ९४२३३०००४७ , प्रा हर्षवर्धन वाघ, सहाय्यक प्राध्यापक ९४०४४०२९८५
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!