*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल भेडशीची खेळाडू भूमी सावंतची महाराष्ट्र शालेय साॅफ्टबाॅल संघात निवड !*
*सावंतवाडी : सिंधुदुर्ग*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय, नागपूर आयोजित राज्यस्तरीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा व निवड चाचणीतून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज भेडशी हायस्कूल (ता. दोडामार्ग) ची विद्यार्थीनी कु. भूमी हणमंत सावंत हिची महाराष्ट्र राज्य शालेय साॅफ्टबाॅल (17 वर्षाखालील मुली) संघात निवड झाली आहे.
रविवार दिनांक 05 जानेवारी 2025 ते गुरुवार दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी दरम्यान राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा जळगांव (महाराष्ट्र) येथे संपन्न होणार आहेत. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर मॅडम , कार्याध्यक्ष डाॅ. मिलिंद तोरसकर साहेब , सचिव श्री.संतोष सावंत साहेब , खजिनदार श्री.वैभव नाईक साहेब , समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर मॅडम , सहसचिव तथा प्राचार्य नंदकुमार नाईक साहेब , सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस मॅडम व जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कुमारी भूमी सावंत हिचे अभिनंदन करण्यात आले. भूमी हिला कुडासे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री.सोमनाथ गोंधळी साहेब यांचे मार्गदर्शन लाभत आहे.