_*पाहा हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल?*_  📆 २१ फेब्रुवारी २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२१:*

_*पाहा हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल?*_ 📆 २१ फेब्रुवारी २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२१:*

*कोकण Express*

💥 _*पाहा हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल?*_

📆 २१ फेब्रुवारी २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२१:*

🐏 *मेष*
गुरू आणि मंगळ अनुकूल आहेत. बुधवार ते शनिवार हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मंगळवारी नव्या कार्याचा शुभारंभ करु शकतात. व्यवसायाच्या संबंधित रखडलेले काम मार्गी लागेल. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा, निळा आणि लाल.

🐐 *वृषभ*
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशस्वी ठरेल. बुधवार ते शनिवार या काळात व्यवसायात धनलाभ होईल. रखडलेले काम मार्गी लागेल. अन्न दान करा. शनिवारी आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग – पांढरा आणि निळा.

‌👩‍❤️‍👨 *मिथुन*
बुधवार नंतर व्यवसायात कोणत्याही नव्या कामाचा शुभारंभ करु शकता. राजकीय व्यक्तींना कामात यश मिळेल. विद्यार्थी प्रगती करतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होतील. गुरुवारी हरभरा डाळीचे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि नारंगी.

🦀 *कर्क:-*
शनि, बुध आणि चंद्र यांचे संक्रमण व्यवसायासाठी अनुकूल आहे. अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. मंगळवारनंतर व्यवसायात पैशाचे आगमन होईल आणि त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. गुरुवार ते शनिवार या दरम्यान प्रवासाची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग – केशरी आणि लाल.

🦁 *सिंह:-*
मंगळवारपर्यंत कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. बुधवार नंतरचा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. मंगळवार ते शुक्रवार या काळात नवीन वाहने खरेदी करता येतील. या आठवड्याचा शुभ रंग – नारंगी.

👧 *कन्या:-*
नोकरीच्या संदर्भात थोडा ताणतणाव असेल. बुधवारनंतर शुक्र आणि चंद्र व्यवसायात लाभ देतील. बुधवार ते शनिवार हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. श्री विष्णूजींची उपासना करत रहा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि केशरी.

⚖️ *तूळ:-*
मंगळवारनंतर तुम्हाला यश प्राप्त होईल आणि धनलाभ होईल. व्यवसायाच्या दृष्टीने बुधवारनंतरचा काळ लाभदायक असणार आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. अन्न, कपडे दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – पांढरा आणि हिरवा.

🦂 *वृश्चिक:-*
हा आठवडा थोडासा संघर्षमय असणार आहे. व्यवसायात गुरुवारनंतर यश प्राप्त होईल. आरोग्याबाबत जागरूक रहावे लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. श्री लक्ष्मीमातेची पूजा करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याचा शुभ रंग – लाल.

🏹 *धनू:-*
या आठवड्यात घर बांधकामाशी संबंधित कामे हाती घ्याल. बुधवार ते शनिवार या काळात नोकरी, कामाधंद्यात व्यस्त असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि पांढरा.

🐊 *मकर:-*
नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने प्रगती होईल. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि निळा.

⚱️ *कुंभ:-*
या आठवड्यात नवीन वाहन खरेदी कराल. बुधवार नंतर व्यवसायात प्रगती आणि धनलाभ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आपल्या कार्यात यश मिळेल. मंगळवारी आणि रविवारी अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – निळा आणि पांढरा.

🦈 *मीन*:-
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. नियमितपणे पूजा-अर्चा करा. मित्रांच्या सहकार्याने नवीन योजना, प्रकल्प सुरू कराल. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि लाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!