*कोंकण एक्सप्रेस*
*महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांचे कणकवलीत स्वागत*
*कणकवली : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा व महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी आज सिंधुदुर्ग दौरा प्रारंभ करण्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट दिली.त्यावेळी अबिद नाईक यांच्या पत्नी सौ. हुमेरा नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यावेळी अबिद नाईक यांच्या आई सौ हवाबी नाईक,वडील अब्दुल नाईक,मुलगी रिजा नाईक,वहिनी सौ नजमा नाईक,पुतणी महेक नाईक,पुतण्या अली नाईक,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,महिला तालुकाध्यक्ष सौ स्नेहल पाताडे,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,प्रांतिक सदस्य विलास गावकर्श,हर अध्यक्ष इम्रान शेख, युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,शहर चिटणीस विशाल पेडणेकर,सचिन अडुळकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे,केदार खोत आदी उपस्थित होते.