*कोकण Express*
*नांदगाव ग्रा.पं.च्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी…*
कणकवली तालूक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मराठी पत्रकाररतेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली 20 फेब्रवारी रोजी शासकीय जयंती साजरी करण्याचा आदेश काढल्याने शासनाने जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर ही जयंती प्रथमच नांदगाव ग्रा.पं. येथे साजरी करण्यात आली.काहींना उशीरापर्यंत आदेशाची प्रत मिळाल्या नव्हत्या यामुळे कणकवली तालूक्यात तहसिलदार कार्यालय व त्यापाठोपाठ नांदगाव ग्रा.पं. कार्यालयात बाळशास्त्रींची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर ,उपसरपंच निरज मोरये ,पत्रकार ऋषिकेश मोरजकर,ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर ,रविराज मोरजकर, विजय मोरये,तसेच ग्रा.पं.सदस्य ,कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली . यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी नांदगाव ग्रा.पं.ला त्यांची प्रतिमा भेट म्हणून दिली .