*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट येथील सुशीला गोविंद बालेघाटकर यांचे दुःखद निधन*
*कणकवली : प्रतिनिधी*
फोंडाघाट- हवेलीनगर येथील ग्रामस्थ,राजाराम तथा बबन बालेघाटकर यांच्या मातोश्री,श्रीमती सुशीला गोविंद बालेघाटकर ( वय 85 ) वर्षे यांचे वृद्धापकाळतील प्रदीर्घ आजारात राहत्या घरी दुःखद निधन झाले.
सिंधुदुर्ग बँकेच्या फोंडाघाट शाखेतील ज्येष्ठ लिपिक सौ.नीतिशा बालेघाटकर यांच्या या सासूबाई होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई- सून- नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल परिसरात शोक व्यक्त होत आहे.