सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांतर्फे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांतर्फे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांतर्फे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा*

*सिंधुदुर्गनगरी : ओरोस*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्याक बांधवांतर्फे अल्पसंख्यांक मंच, सिंधुदुर्ग द्वारा अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.

संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृत केला आहे.त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती,भाषा,धर्म,परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे, तसेच याबाबतचे वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सूचना दिलेल्या आहेत.त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

यावेळी जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांनी अल्पसंख्याकांचे हक्क यावर मार्गदर्शन केले. तसेच अल्पसंख्याक अधिकारी श्री यशवंत बुधावळे यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी एड.अशोक रोडे यांनी अल्पसंख्याक नागरिकांना घटनात्मक व कायदेशीर हक्क यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी म्हणून हाजी शेरपूद्दीन बोबडे, ऍन्थनी डिसोजा,महेश परुळेकर व अल्पसंख्याक समाजाचे श्री व्हिक्टर डान्टस,निसार शेख,श्री मठकर,एड अश्फाक शेख,एड रईस पटेल,शाहनवाज शाह,रफिक मेमन,मजीद बटवाले,अस्लम निशाणदार व अल्पसंख्याक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश परुळेकर, सूत्रसंचालन रौनक पटेल तर आभार प्रदर्शन मुरादअली शेख यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!