*कोकण Express*
*हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी अमित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
हिंद भारतीय जनरल कामगार सेना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी अमित वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांनी त्यांना दिले आहे.