*कोंकण एक्सप्रेस*
*मुंबई बोट अपघात घटनेतील 13 प्रवाशांचा मृत्यू ,बोट मालकावर गुन्हा दाखल होणार*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
मुंबईतील बोट अपघात प्रकरणातील माहिती समोर आली असून बोट चालकाचा दावा खोटा ठरवणारी माहिती समोर आली आहे.नीलकमल ही बोट बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 06.30 ते 07.00 च्या दरम्यान गेट ऑफ इंडिया जवळ समुद्रात बुडाली.या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत असून परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला.
दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते.बोटीची क्षमता 80 असताना त्यातून 110 प्रवाशी प्रवास करत होते.त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे.दरम्यान या प्रकरणी 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.त्यातील तीन जण नौदलाचे आहे तर दहा नागरिक आहे, असे माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली.
भारतीय नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की,अपघातात १०१ लोकांना वाचवण्यात आले आहे.संध्याकाळी ७.३० पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही.या घटनेची भारतीय नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.
मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे निघाली होती.या बोटीची क्षमता एकूण 80 प्रवाशांची आहे.परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते.एकूण 110 प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे.आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.