*कोंकण एक्सप्रेस*
*कट्टा वराडकर हायस्कूलचे उद्यापासून स्नेहसंमेलन*
*कट्टा : प्रतिनिधी*
येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन १९ व २० डिसेंबर रोजी वराडकर हायस्कूलच्या सिद्धिविनायक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.यात १९ रोजी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लक्षवेधी कार्यक्रम सादर होणार आहे.
या स्नेहसंमेलनात १९ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम होणार असून यामध्ये कोळीनृत्य, गोंधळ, धनगरी नृत्य, शिमगोत्सव, दीपनृत्य, बाल्या डान्स आदी नृत्य प्रकार तसेच दशावतारी नाटक, फुगडी सादर होणार आहे. २० रोजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक केशव भिसे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कट्टा वरची गुरामवाडीचे सरपंच तथा क.पं.शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष शेखर पेणकर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर उपस्थित राहणार आहेत.
विश्वस्त व निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, विश्वस्त अॅड. एस.एस.पवार,उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सदस्य स्वाती वराडकर, श्रुती वराडकर, सुप्रिया वराडकर, शिवराम गुराम, महेश वाईरकर, सल्लागार समिती सदस्य डॉ. व्ही. सी. वराडकर, व्हिक्टर डान्टस, सुहास वराडकर, दीपक पेणकर, अॅड. ऋषी देसाई, प्रभाकर वाईरकर, संतोष साटविलकर आदी उपस्थित राहणार आहेत. स्नेहसंमेलनास उपस्थित राहवे, असे आवाहन वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ध्वजेंद्र मिराशी यांनी केले आहे.