स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्यु.कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा २२ डिसेंबरला

स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्यु.कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा २२ डिसेंबरला

*कोंकण एक्सप्रेस*

*स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय ज्यु.कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा २२ डिसेंबरला*

*कणकवली : प्रतिनिधी*

स्पोटर्स फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय / ज्युनियर कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा २०२४-२५ दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी एस.एस.पी.एम.इंजिनिअरींग कॉलेज, कणकवली येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार आहे.

याकरिता वयोगट : ८/१०/१२/१४/१७/१९ वर्षाखालील मुले / मुली असा ठेवण्यात आला आहे.सर्व वयोगटातील खेळाडू ५० मीटर, १०० मी.धावणे,गोळा फेक,भाला फेक,थाळी फेक,रिले अशा विविध प्रकारात भाग घेऊ शकतात.यासाठी प्रवेश शुल्क ५०/- फक्त प्रति क्रीडा प्रकार ,रिले २००/- फक्त ठेवण्यात आले आहे.अंतिम नोंदणी दि. १८ डिसेंबर २०२४ नंतर आलेल्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.

प्रथम तीन विजेत्यांना गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल व प्रमाणपत्र.सर्व खेळांडूना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.अंतिम महाविजेत्या शाळा/महाविद्यालयाला आकर्षक चषक देण्यात येईल.यावेळी श्री. बयाजी बुराण – प्रमुख मार्गदर्शक,श्री.दत्तात्रय मारकड – क्रीडा समन्वयक, कणकवली उपस्थित राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक तेजस घाडीगांवकर – ९५२९९४०४६१ ,प्रशांत घाडीगांवकर ९०२२४९०५३२,स्वप्निल कदम ८७६७०५६८१८,रोशन सावंत – ९३५९५६९७६१,श्री. डी. डी. सावंत सर (सेक्रेटरी) ९४२१३७२५४६ यांच्याशी संपर्क साधावा तसेच आपल्या शाळा / महाविद्यालयातील जास्तीत जास्त स्पर्धक पाठवून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!