*कोंकण एक्सप्रेस*
*२४ डिसेंबरला कणकवलीत गीत रामायणातील निवडक रचनांचा नृत्याविष्कार*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवलीमध्ये प्रथमच मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, जानवली येथे “नृत्यार्पण… गीत रामायण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु श्रीमती दिपाली विचारे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने, ऋतुजा नृत्यालय पालघरच्या २२ विद्यार्थिनी आणि सौ.प्रीती शिंदे हा नृत्याविष्कार सादर करणार आहेत.सुप्रसिद्ध गायक श्री.सुधीर फडके आणि कवी ग.दि.माडगूळकर यांच्या अजरामर गीत रामायणातील निवडक रचनांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे.