*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेडिकल कॉलेज यात समन्वय नाही – आम.निलेश राणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष*
*गोरगरीब रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा फटका*
*नागपूर*
हिवाळी अधिवेशनादरम्यान मा.आमदार निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेडिकल कॉलेज यात समन्वय नाही.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे.
त्याचप्रमाणे या महाविद्यालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.येथे पुरेश्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही.त्यामुळे रुग्णांनाही पुरेशा सेवा मिळत नाहीत.या संदर्भात मा.राज्यपाल यांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देत असताना सभागृहाचे लक्ष वेधले.