महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी रूपाली चाकणकर सिंधुदुर्गात – अबिद नाईक

महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी रूपाली चाकणकर सिंधुदुर्गात – अबिद नाईक

*कोंकण एक्सप्रेस*

*महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी रूपाली चाकणकर सिंधुदुर्गात – अबिद नाईक*

*जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन*

*सिंधुदुर्ननगरी : प्रतिनिधी*

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपाली चाकणकर या १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहे.यावेळी त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.तसेच वेंगुर्ले येथे महिला मेळावा घेण्यात येणार आहे,अशी माहिती पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.

चाकणकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची नियोजन सभा सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली.त्यानंतर पत्रकार परिषद नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रदेश सचिव सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष आर.के.सावंत,प्रांतिक सदस्य विलास गावकर,जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष उदय भोसले, तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, प्रांतिक सदस्य बाळा कोयडे ओबीसी जिल्हाध्यक्ष सर्वेक्ष पावसकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण, सत्यवान गवस,तालुकाध्यक्ष नाथा मालडकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे,महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, ऋतुजा शेतकटर, रिद्धी परब,पूजा पेडणेकर,श्रेया मुद्रस आदी उपस्थित होते.

यावेळी नाईक म्हणाले,चाकणकर १८ डिसेंबरला सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक १९ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांच्या तक्रारी वर सुनावणी होऊन त्या सोडविल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांनी पुढे यावे आणि काही अडचण वाटल्यास महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब यांच्याशी संपर्क करावा.

सुनावणी पूर्ण झाल्यावर दुपारी ३ ते ४ या वेळेत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.त्यानंतर ४ ते ५.३० यावेळेत वेगुर्ला येथील कालेलकर नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा महिला मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याच्या दौऱ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!