*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प मतदार संघातील मठ ग्रामपंचायत हद्दीत भाजपा सदस्य नोंदणीचा शुभारंभ*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
भाजपाच्या मठ गावच्या सदस्य अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी बैठक स्वयंभु मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले कि,सावंतवाडी विधानसभेमध्ये भाजप चे एक लाख सदस्य बनविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले असुन वेंगुर्ले तालुक्यात किमान २५००० सदस्य नोंदणी होणे आवश्यक आहे. म्हणूनच वेंगुर्लेत प्रत्येक गावामध्ये जाऊन सदस्य नोंदणी शुभारंभ केला जात आहे.
यावेळेस तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी या अभियानात भाजप च्या सर्व लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन केले.या बैठकीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस व सिंधुदुर्ग जिल्हयातुन आमदार नितेश राणेंची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर,सोसायटीत चेअरमन सुभाष बोवलेकर,ता.का.सदस्य अजित नाईक,बुथ प्रमुख अनिल तेंडोलकर व उमेश धुरी,महेश धुरी,प्रसाद सावंत,उमेश मठकर,रविंद्र खानोलकर, बबली मठकर,दिवाकर गावडे,स्वप्नील मठकर,रंजन कडुलकर,दामु मठकर,अवी खानोलकर,मिलिंद मठकर इत्यादी उपस्थित होते.