ओरोस रवळनाथाचा १९ डिसेंबरला वार्षिक जत्रोत्सव

ओरोस रवळनाथाचा १९ डिसेंबरला वार्षिक जत्रोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*ओरोस रवळनाथाचा १९ डिसेंबरला वार्षिक जत्रोत्सव*

*सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी*

ओरोस गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव १९ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्री देव रवळनाथाची विधीवत पूजा,आरती,ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे व अखंड दर्शन सोहळा.रात्री ११ वाजता तरंगांसह पालखी प्रदक्षिणा,त्यानंतर वालावलकर दशावतारी मंडळाचे नाटक होणार आहे. २० रोजी सकाळी ७ वाजता दहिकाला व २१ रोजी दुपारी १ वा. समाराधनाचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले आहे.

या जत्रोत्सव कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन ओरोस ग्रामस्थ व श्री देव रवळनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!