कणकवली पोलीस ठाणे येथे “पोलीस पाटील दिन २०२४” उत्साहात साजरा

कणकवली पोलीस ठाणे येथे “पोलीस पाटील दिन २०२४” उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली पोलीस ठाणे येथे “पोलीस पाटील दिन २०२४” उत्साहात साजरा*

*कणकवली : प्रतिनिधी*

शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन “पाटील” हे पद अस्तित्वात आले,पोलीस पाटील यांची प्राचीन काळापासुन गावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्त्वाची भूमिका आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही पोलीस पाटील यांचा सहभाग असतो.इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था व महसूल यावर देखरेख करण्याचे कार्य पाटील करत असे.ब्रिटिश काळात प्रथमता “मुंबई ग्राम पोलीस अधिनियम १८६७” अंमलात आणला गेला.१७ डिसेंबर १९६७ रोजी पोलीस पाटील ह्या पदाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी “ग्राम पोलीस अधिनियम १९६७” कायदा करून पोलीस पाटील यांची गाव पातळीवर निर्मिती करण्यात आली.

नुकताच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका कणकवलीच्या वतीने पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कणकवली पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच ऍड नंदन वेंगुर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे,वनविभागाचे रेंजर श्री.भुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे सत्कार महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका कणकवलीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघ तालुका कणकवलीचे सर्व पदाधिकारी,तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!