रायगड येथे मुंबई गोवा महामार्गवर ट्रेलर उलटून चालक ठार

रायगड येथे मुंबई गोवा महामार्गवर ट्रेलर उलटून चालक ठार

*कोंकण एक्सप्रेस*

*रायगड येथे मुंबई गोवा महामार्गवर ट्रेलर उलटून चालक ठार*

*रायगड*

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांसाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर डिवायडरला धडकून भीषण अपघात झाला.हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला.

हा अपघात सोमवारी (दि. १६) रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला असून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कोलाड बाजूकडून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्रं.एम.एच.४६ बी.एम. ६३३१ सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे आपल्या ताब्यातील गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन डिवायडरला धडकला.त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर १० ते १५ फुट अंतरावर उडून होऊन ट्रेलर देखिल पूर्णपणे पलटी झाला. त्यामुळे ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय- ३३) हाकेबिनमध्येच अडकून जागीच ठार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!