सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा व आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा व आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करा

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा व आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करा*

*रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.गिरीशकुमार चौगुले यांच्याकडे भाजपा शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर यांची मागणी*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली हृदयरोग तज्ञ आणि भुलतज्ञाची मंजूर असलेली प्रत्येकी दोन पदे तात्काळ भरण्यात यावीत तसेच ऑपरेशन थिएटर आणि सीटीस्कॅन यंत्रणा कायम चालू रहावी यासाठी जनरेटरची सोय तात्काळ करण्यात यावी अशी मागणी सावंतवाडी महीला भाजपाच्या माध्यमातून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ गिरीशकुमार चौगुले यांच्याकडे शहर अध्यक्षा मोहीनी मडगावकर यांच्या माध्यमातून करण्यात आली.रुग्णालयात असलेल्या विविध समस्या बाबत मंत्री नितेश राणेंचे लक्ष वेधणार असून रुग्णांना चांगली सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे असे सौ मडगावकर यांनी सांगितले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी अनेक रुग्ण सेवा घेत आहेत महामार्गावर असल्यामुळे आपत्कानील परिस्थिती या रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल केले जाते.परंतू त्या ठीकाणी विज नसल्यानंतर अत्यावश्यक प्रसंगात महत्वाची असलेली सिटीस्कॅन मशीन सुरू होत नाही.त्यामुळे अनेक रुग्णांना परत किंवा अन्य ठीकाणी पाठवावे लागते.लाईट नसल्यामुळे ऑपरेशन थिएटर मध्ये अनेक अडचणी येतात.त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष द्यावा. तसेच रिक्त असलेली हदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञ पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी श्री चौगुले यांच्याकडे केली.

याबाबत आम्ही वरिष्ट स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे.याबाबत आपल्याला माहीती देवू लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करा असे चौगुले यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,मेघना साळगावकर,ज्योती मुद्राळे,मेघा भोगटे,सविता टोपले,अन्वीषा मेस्त्री आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!