मालवण सह कोकण किनारपट्टीवर परराज्यातून घुसखोरी करणाऱ्या मल्टी बोटी,ट्रॉलरचा उपद्रव थांबवा – आम.निलेश राणे

मालवण सह कोकण किनारपट्टीवर परराज्यातून घुसखोरी करणाऱ्या मल्टी बोटी,ट्रॉलरचा उपद्रव थांबवा – आम.निलेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*मालवण सह कोकण किनारपट्टीवर परराज्यातून घुसखोरी करणाऱ्या मल्टी बोटी,ट्रॉलरचा उपद्रव थांबवा – आम.निलेश राणे*

*कुडाळ, मालवण चे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत स्थानिक मच्छिमारांचे मांडले प्रश्न*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नांची घेतली दखल*

*नागपूर : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यासह कोकण किनरपट्टीवर परराज्यातून घुसखोरी करणाऱ्या मल्टी बोटी,ट्रॉलर यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरू आहे तो थांबवा.या बोटी बेकायदेशीर घुसून खोल मासेमारी करतात.या बेकायदेशीर मासेमारी मुळे स्थानिक छोट्या मोठ्या मासेमारी करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे स्थानिक मच्छिमार फारच त्रासस्थ आहे. जगावे कसे असा प्रश्न स्थानिक मच्छिमारांन समोर आहे.या मल्टी बोटी,ट्रॉलर स्थानिक मच्छिमारांची जाळी आणि बोटी तोडतात.असे असतांनाही या ठिकाणी गस्ती पथके नाही किंवा मच्छिमारांना कोणतेच संरक्षण नाही.या मासेमारी साठी कर्नाटक,आंद्रा सारख्या राज्यातून होत असलेली घुसखोरी थांबवा अशी आग्रही मागणी औचित्याच्या मुद्द्यावर आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्याची दाखल घेवून योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.

कुडाळ,मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी आज विधानसभेत मच्छिमारांचे प्रश्नावर आग्रही भूमिका घेत विधानसभेत मांडले.यावेळी आमदार निलेश राणे यांनी मच्छिमारांची भूमिका सभागृहात मांडताना,कर्नाटक,आंद्र अशा अनेक पर राज्यातील मोठ मोठ्या मल्टी बोटी, ट्रॉलर समुद्र मार्गाने कोकणात येतात. माझ्या मालवण आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यावर खोल मासेमारी करतात.त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. गस्त पथके नाहीत.कसाब सारखा आतंकवादी समुद्र मार्गाने राज्यात आला होता.तसे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून समुद्र सुरक्षा वाढवावी आणि अन्य राज्यातील बोटी ट्रॉलर जो उपद्रव करताहेत तो थांबवावा आणि स्थानिक मच्छिमारांना सुरक्षा द्यावी.खोल समुद्रातील मासेमारी थांबवावी.परराज्यातील घुसखोर मासेमारी थांबवावी अशी मागणी यावेळी आमदार निलेश राणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!