*कोंकण एक्सप्रेस*
*९ जानेवारीपासून कणकवलीकरांना कणकवली पर्यटन महोत्सव 2024-25 ची पर्वणी*
*९ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
येत्या नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात ९ जानेवारीपासून १२ जानेवारी पर्यंत कणकवलीकरांसाठी कणकवली पर्यटन महोत्सवाचे आयोजन येथील उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर करण्यात आले आहे.यानिमित्ताने ९ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा व चित्ररथ सायं.4.00 वाजता पटकीदेवी मंदिर ते ढालकाठी मार्गे,नाका आप्पासाहेब चौक ते महोत्सव स्थळापर्यत काढण्यात येणार आहे.तसेच सायं.६.३० वाजता फुड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवली पर्यटन महोत्सव 2025 कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ रात्री ९.०० वाजता मा.कॅबिनेट मंत्री नितेशजी राणे साहेब,मा.आमदार निलेशजी राणे साहेब व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.यानिमित्ताने चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम, कुशल बद्रीके व अन्य कलाकार यांचा धमाल कॉमेडी शो “जल्लोष” आणि ऑकेस्ट्रा असा तीन तासाचा कार्यक्रम सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे.
याचबरोबर १० जानेवारी रोजी “आम्ही कणकवलीकर” मंडळाच्या वतीने सुमारे २५० नामवंत कलाकारांसहीत श्री.सुहासजी वरुणकर व प्रा.श्री.हरीभाऊ भिसे यांच्या संकल्पनेतून साकारलेला भरगच्च संगीत,नृत्य व कॉमेडी असा रंगीत कार्यक्रम सांय ७.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.११ जानेवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता.बेधुंद (म्युझिकल नाईट) हा संगीत नजराणा आयोजित करण्यात आला आहे.
१२ जानेवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्यातील सर्व नामवंत कलाकारांचा भव्य संगीत रजनीचा (ऑकेस्ट्रा) कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री ९.०० वाजता केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे साहेब,मा.कॅबिनेट मंत्री नितेशेजी राणे साहेब,मा.आमदार निलेशजी राणे साहेब व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत कणकवली पर्यटन महोत्सव 2025 कार्यक्रमाचा समारोप समारंभ होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी कणकवली पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी देखील कणकवली पर्यटन महोत्सव 2025 च्या निमिताने Instagram Reels स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत कणकवलीकरांना एक नवीन व्यासपीठ मा.नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आले आहे. Instagram Reels स्पर्धा ही कणकवली पर्यटन महोत्सव 2025 शी निगडित असणार आहे व शहराच्या कला. क्रीडा, सांस्कृतिक, यासह खाद्य संस्कृती यावर आधारित असावी. या स्पर्धेकरिता स्पर्धकांनी Instagram वर पोस्ट करायच्या Reels (व्हिडिओ) हे जास्तीत जास्त एक मिनिटापर्यंतचे असावेत.त्यापेक्षा मोठे रील 01 जानेवारी 2025 ते 07 #sameer.nalawade9966 च्या पेजवर असू नयेत. जानेवारी 2025 पोस्ट करायचे तसेच है (व्हिडिओ) पर्यतच Instagram च्या आहेत.त्यानंतर येणा- या Reels (व्हिडीओ) या स्पर्धेकरता ग्राह्य धरले जाणार नाहीत.कणकवली शहर मर्यादित ही स्पर्धा असणार असून,कणकवली शहरातील उत्कृष्ट Reels बनवणा-या तीन स्पर्धकांची व त्यांच्या Reels ची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.या स्पर्धकांना पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.तसेच उत्कृष्ट 3 Reels या कार्यक्रमस्थळी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.या पेजवर आक्षेपार्ह कोणत्याही Reels (व्हिडीओ) पोस्ट करण्यात येऊ नयेत.त्या रील या स्पर्धेकरता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.या पेजवर Reels पोस्ट करत असते वेळी पुढील प्रमाणे युजरनेम टॅग करावे. *#sameer.nalawade9966*असे आवाहन कणकवली मा. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.