*कोकण Express*
*बाळशास्त्री जांभेकर यांचा पत्रकारितेतील आदर्श तरुण पत्रकारांनी घ्यावा*
*सिंधूदुर्गनगरी*
समाज प्रबोधनासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत दर्पण या साप्ताहिकाच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता जोपासली. त्यांचा समजिक दृष्टीकोनातून पत्रकारितेतील आदर्श आजच्या तरुण पत्रकारांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आज शासकीय बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त बोलताना केले. २० फेब्रुवारी हा दिवस मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दीन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने येथील पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवाजी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते पुरस्कार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हा माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, दत्तप्रसाद वालावलकर, लवू म्हाडेश्वर, मनोज वारंग, सतीश हरमलकर, तेजस्वी काळसेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या, दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांचे समाज प्रबोधनात्मक कार्य मोलाचे आहे. शासनाने २० फेब्रुवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून साजरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दरवर्षी आता हाच दिवस बाळशास्त्री जांभेकर यांची शासकीय जयंती म्हणून साजरा केला जाणार आहे. असे सांगतानाच पत्रकारितेचा वारसा जोपासत त्यांनी ६ जानेवारी पासून दर्पण हे साप्ताहिक सुरू केले आहे. समाज प्रबोधनाच्या कामात त्यांना सिंहाचा वाटा होता. सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याचा जिल्ह्यातील पत्रकारांनी त्यांचा वारसा जोपासावा आणि समाज प्रबोधनात्मक कार्य सुरू ठेवावे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.